Friday, November 22, 2024
Homeराष्ट्रीयAssam : पूरस्थिती आजही गंभीर, 3 लाख विस्थापित, शेती उद्ध्वस्त

Assam : पूरस्थिती आजही गंभीर, 3 लाख विस्थापित, शेती उद्ध्वस्त

आसाम : आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या म्हणण्यानुसार, राज्यभरात पडत असलेल्या सततच्या मुसळधार पावसाने आसाममधील 19 जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर आहे. Asaam

गेल्या 24 तासात 2,96,384 लोक बाधित झाले आहेत. दुसऱ्यांदा मान्सूनच्या अतिवृष्टीने महापूर flood आला आहे, कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. Assam news

पुराच्या पहिल्या लाटेत, अंदाजे 20,000 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले, ज्यामुळे 3,937 गावांमधील सुमारे 167,222 कुटुंबे प्रभावित झाली. Assam News

उन्हाळी भात, तेलबिया, कडधान्ये, ताग, भाजीपाला आणि फळे आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लागोपाठ आलेल्या दोन महापुरामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात स्थिती आणखीनच बिकट झाली.Asaam

सुमारे 85,514 हेक्टर भातशेती नष्ट झाली आणि 9,178 गावांमधील 845,434 शेतकरी कुटुंबे प्रभावित झाली. तेलबिया, ऊस आणि खरीप भाजीपाला यांसारख्या इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Assam

आसाम सरकारच्या कृषी विभागाने बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत 1,958-हेक्टर सामुदायिक रोपवाटिकेची देण्यात येणार आहेत.

येथील भात पीक मुख्य उत्पादन आहे, त्यासाठी 19,580 हेक्टर जमिनीवर पेरणीसाठी सक्षम भाताची रोपे सरकार उपलब्ध करून देणार आहे.

तसेच सरकारने विविध मदत योजनांसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, जे आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सावरण्यासाठी भात, लसूण, कांदा, काळी मसूर आणि मका या पिकांसाठी बियाणे खरेदीसाठी उपयोगी पडणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय