Friday, May 3, 2024
Homeजिल्हाआशा व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन

आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन

नंदुरबार : आरोग्य विभागात कार्यरत आशा व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने किमान वेतन द्या, वेतन सुसूत्रीकरण मध्ये आरोग्य विभागात गट प्रवर्तक सामावून घ्या, सामाजिक सुरक्षा लागू करा, मोफत काम करून घेणे बंद करा, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा, गटप्रवर्तक संघटना (आयटक) च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे यांनी निवेदन देण्यात आले. आशा व गटप्रवर्तकानना इतर जिल्ह्याप्रमाणे कोरोना प्रोत्साहन भत्ता कामाचा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गटप्रवर्तक चे सेल्फी फोटो सह भेट देण्याचे फोटो पोस्ट ऑफिस केली नाहीत. तरी मानधन कपात होणार नाही याचे आश्वासन दिले. थकीत आशा, गटप्रवर्तक मानधन 4 दिवसात वर्ग करण्यात येईल. तसेच राज्य पातळीवरील व केंद्र सरकार पातळीवरील मागण्या पाठवण्यात येतील असे म्हणाले.

या प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. चौधरी, प्रसाद सोनार यांनी शिष्टमंडळाशी उपस्थित होते. दीपावली पूर्वी प्रश्न मार्ग लावा. केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांना 2018 पासून मानधन वाढ केली नाही. त्यामुळे खासदार हिना गावित यांच्या संपर्क कार्यलयावर आयटक वतीने आशा व गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचर तिरंगा हातात घेऊन भव्य मोर्चा किमान वेतन साठी काढण्याचा इशारा, संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी दिला.

यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड वैशाली खंदारे, कॉम्रेड ईश्वर पाटील, वसंत पाटील, माया घोलप, आयटक नेते ललिता माळी, रत्ना नंदन, गुली पावरा, गुलीता वळवी, सोनी वळवी, कल्पना कोकणी, कल्पना गावित, रेखा वसावे, सुमित्रा वसावे, मंदाकिनी पाटील, संगीता बिरारे, एरिना गावित, आशा धनगर, सरला ब्राह्मणे, कल्पना पाडवी, अनिता जांभरे, सारिका पाडवी, ममता गावित, चंद्रकला वसावे, अरुणा वसावे, बेबी वळवी, सुमन वळवी आदींसह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय