Friday, November 22, 2024
Homeराजकारणआंबेडकरी कार्यकर्ता अरविंद बनसोडे यांची जातिवादातून हत्या? आरोपी राष्ट्रवादीचा पदाधिकारी

आंबेडकरी कार्यकर्ता अरविंद बनसोडे यांची जातिवादातून हत्या? आरोपी राष्ट्रवादीचा पदाधिकारी

(प्रतिनिधी):- नागपूर वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोडे यांचा 27 मे ला संशयास्पद मृत्यू झाला. आरोपी मिथिलेश उमरकर याने अरविंद यांची हत्या केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने लावला आहे. गॅस एजन्सीचा नंबर पाहिजे असल्याने अरविंदने बोर्डचा फोटो काढलाच्या वादातून अरविंद यांची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. आरोपी मिथिलेश उमरकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असून पंचायत समिती सदस्य आहे तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निकटवर्ती असल्याचे बोलले जात आहे. एका व्यक्तीने गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोपी यांचा सोबतचा फोटो हि ट्विट केला आहे.

अरविंद यांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेला आत्महत्येचा रंग देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वंचित आघाडीने केला आहे. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठून न्याय देण्याची मागणी केली आहे. त्याच बरोबर ट्विटर वर #justiceforarvindbansode हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय