Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा

नवी दिल्ली : चीनमध्ये 15 दिवस सुरू असलेल्या  19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अद्वितीय कामगिरी केली आहे. 8 ऑक्टोबर अखेरचा दिवस होता. भारतीय खेळाडूंनी  प्रथमच चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या महिला कबड्डी संघाने सुवर्ण पदकावर नाव कोरले. यानंतर भारताच्या एकूण पदकांची संख्या 100 आणि सुवर्ण पदकांची संख्या 25 झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारताने सर्वाधिक 70 पदके जिंकली होती. Appreciation from Prime Minister for India’s best performance in Asian Games

यावेळी भारताने तिरंदाजीमध्ये एकूण 9 पदके जिंकली, ज्यात 5 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यानंतर कुस्तीमध्ये भारताने 1 रौप्य आणि 5 कांस्य अशी 6 पदके जिंकली. बॉक्सिंग, रोइंग आणि स्क्वॅशमध्ये भारताने प्रत्येकी 5 पदकांची जिंकली. बॅडमिंटनमध्येही भारताला 3 पदके मिळाली. तसेच सेलिंगमध्येही भारताने 3 पदके जिंकली. त्याचबरोबर रेगू-सेपक टेकराव, वूशू, ब्रिज, कॅनोए, गोल्फ आणि टेबल टेनिस या खेळांमध्ये भारताला प्रत्येकी 1 पदक मिळाले. बुद्धिबळ, घोडेस्वारी, रोलर स्केटिंग आणि टेनिस या खेळांमध्ये प्रत्येकी 2 पदके मिळाली. याशिवाय क्रिकेट, हॉकी आणि कबड्डी या सांघिक खेळांमध्येही भारताच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांना मिळून प्रत्येकी 2 पदके मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 60 वर्षातील भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील 107 या सर्वोच्च पदकसंख्येसह आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची  प्रशंसा  केली आहे. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या अविचल दृढनिश्चयाचे, कठोर जिद्द आणि परिश्रमाचे कौतुक केले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही ऐतिहासिक कामगिरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्या अतुलनीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोच्च एकूण 107 पदके मिळवून दिल्याने संपूर्ण देश आनंदित आहे, ही गेल्या 60 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

आपल्या खेळाडूंच्या अविचल दृढनिश्चय, कठोर जिद्द आणि परिश्रमाने देशाचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या या विजयाने आपल्याला कायमस्वरणात राहतील असे क्षण दिले आहेत, आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे आणि उत्कृष्टतेसाठीच्या आपल्या कटिबद्धतेची पुष्टी केली आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करताना म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय