Sunday, May 19, 2024
Homeराज्यMPSC निवड झालेल्या आदिवासी उमेदवार यांची जातवैधात प्रमाणपत्र पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती आदेश...

MPSC निवड झालेल्या आदिवासी उमेदवार यांची जातवैधात प्रमाणपत्र पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती आदेश देण्यात येऊ नयेत; आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनची मागणी.

प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या आदिवासी उमेदवार यांची जातप्रमाणपत्र व जातवैधात प्रमाणपत्र पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती आदेश देण्यात येऊ नयेत अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सादर निकलमध्ये निवड यादी मध्ये अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेवर काही संशयीत बोगस आदिवासी उमेदवार दिसून येत आहेत विशेषतः हे उमेदवार औरंगाबाद विभागातील असल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

आदिवासी समाजाच्या घटनात्मक राखीव जागांचे संरक्षण व्हावे तसेच सादर निवड यादीतील बोगस उमेदवार यांची कसून चौकशी व्हावी. व बोगस उमेदवार यांच्या जागेवर खऱ्या मूळ आदिवासी उमेदवार यांना नियुक्ती देण्यात यावी, तसेच सादर दोषी उमेदवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात असा इशारा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे पुणे विभागीय अध्यक्ष किरण ठोंगिरे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय