Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअण्णाभाऊंच्या लेखणीत कष्टकऱ्यांचे खरे प्रतिबिंब - प्रा.विनोद सूर्यवंशी

अण्णाभाऊंच्या लेखणीत कष्टकऱ्यांचे खरे प्रतिबिंब – प्रा.विनोद सूर्यवंशी

पिंपरी चिंचवड : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे हे आपल्या शाहिरीतून लेखणीतून शोषित, पीडित, दलित, कष्टकरी कामगारांचे जीवन जगासमोर आणले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासह अण्णाभाऊंच्यां सर्व कादंबरी, जितकी पुस्तके आहेत त्यामध्ये कष्टकरी कामगारांचे खरे प्रतिबिंब आणि यातला नायक हा खरा आहे तो कल्पनेतला नाही, असे मत प्रा विनोद सूर्यवंशी यांनी आज व्यक्त केले.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कष्टकरी श्रमिकांचा हुंकार – अण्णाभाऊ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते.

ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ समोर अनेक पर्याय असताना साम्यवाद स्वीकारला. श्रमिकांच्या लढाईसाठी त्यांनी कम्युनिस्ट नेते कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्यासोबत काम केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज ही कष्टकरी कामगारांना झगडावे लागते हे वेदनादायक आहे, अण्णाभाऊंची पात्रे हि श्रमिक कामगारांचे खरे प्रतिबिंब आहेत. मोरारजी देसाई सरकारने तमाशा माध्यमावर बंदी आणल्यानंतर माझी मुंबई द्वारे लोकनाट्य सुरू केले आणि शिवरायाच्या प्रतिमा पूजनाने समाजामध्ये प्रबोधन केले.

यावेळी प्रसिद्ध कवी व लेखक आसाराम कसबे, सोशल मीडिया प्रमुख उमेश डोर्ले, महिला प्रमुख माधुरी जलमुलवार, सुरेश देडे, तुकाराम माने, निरंजन लोखंडे, जरीतास वाठोरे, सुनंदा आठवले, सुनीता पोतदार, नंदा तेलगोटे, नर्मदा दराडे, हेमा राठोड, आबा शेलार, सुभाष निचले, रसूल शेख, आम्रपाली शिंगे, रमेश सोनटक्के, राजश्री बडोरे, लता कांबळे आदी उपस्थित होते.

उपस्थित कष्टकरी कामगार व पाहुण्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आसाराम कसबे यांच्या “अण्णाभाऊंच्या कार्याची साक्ष देई सह्याद्री कडा, पेटविला धडधडा संयुक्त महाराष्ट्राचा लढा ” हि शाहिरी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक माधुरी जलमुलवार, सूत्रसंचालन माया चिमणे यांनी तर आभार फरीद शेख यांनी मानले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय