नागपूर : नागपूर आणि विदर्भाच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे दीपस्तंभ असे ज्येष्ठ नेते कॉ. मधुकर भरणे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पत्नीचेही नुकतेच दु:खद निधन झाले होते. त्यांच्या जाण्यानेकुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या उभारणीत त्यांचे महत्त्वाचा वाटा होता. नागपूर आणि विदर्भाच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेत कॉ. मधुकर भरणे यांच्या जाण्याने एक भयंकर पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी व्यक्त केली आहे.