Tuesday, January 14, 2025
HomeNewsपिंपरी चिंचवड : वाहतूक पोलिसांचा नागरिक द्वेष का करत आहेत, याचा अभ्यास...

पिंपरी चिंचवड : वाहतूक पोलिसांचा नागरिक द्वेष का करत आहेत, याचा अभ्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा – क्रांतिकुमार कडुलकर

पिंपरी चिंचवड : वाहतूक पोलिसांचा नागरिक द्वेष का करत आहेत, याचा अभ्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा, असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतिकुमार कडुलकर यांनी म्हटले आहे.

वाहतूक पोलिस हे लोकांना छळणारे सरकारी वसुली एजंट आहे का? रिक्षावाले, पथविक्रेते, वाहन चालक यांच्याकडून ते हप्ते गोळा करतात का ? शहरातील त्यांच्या नियमभंग विरोधातील कारवाया फक्त सामान्य लोकांवर होतात, असा गंभीर आरोपही कडुलकर यांनी केले आहेत.

 पिंपरी चिंचवडचे वाहतूक पोलीस आणि नागरिक यांच्यातील अतिशय टोकाचे वादविवाद गेल्या काही महिन्यात वाढलेले आहेत. वाहतूक पोलीस नियमाने इमाने इतबारे कर्तव्य बजावत नाही, असा अनुभव शहरातील नागरिकांचा अनुभव असल्याचे बोलले जात आहे.

बेकायदेशीर वाळू वाहतूक, ओव्हरलोडेड वाहने या शहरातून नियमभंग करून दररोज जात असतात. शहरात वाहतूक पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये हिंसक वादविवाद झालेले आहेत. कलम 353 वापरून समस्या कमी होणार नाहीत, असे ही कडुलकर यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय