बहुजन संवाद यात्रेनिमित राज्यातील मातंग समाजाच्या वाड्या,वस्त्यावर आमदार अमित गोरखे यांची भेट (Amit Gorkhe)
नांदेड : महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज आज खेड्यापाड्यात आपले पारंपरिक केरसुनी,दोरखंड यासारखे व्यवसाय आज ही मोठ्या प्रमाणात करीत असून त्यांची उपजीविका त्यावर चालत आहे. लवकरच मी शासनाला समाजाच्या व्यवसायाला मदत आणि प्रोत्साहान मिळण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी जाहीर केले. बहुजन संवाद यात्रेनिमित्त आमदार गोरखे हे आज नांदेड येथे आले होते त्यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. (Amit Gorkhe)
मातंग समाजाच्या केरसुनी आणि दोरखंड यावर उजीविका असणाऱ्या कुटुंबीयांना गोरखे यांनी भेट दिली. त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या तसेच शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
यावेळी नांदेड शहरातील शांतीनगर व प्रीती नगर या दोन वसाहतींना भेट दिली. या भेटी दरम्यान समाजातील काही झाडू विक्रेते यांना आमदार गोरखे यांनी भेट दिली, आजच्या मॉडर्न जमान्यात देखील पारंपरिक झाडूला देखील तितकेच महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खास करून वापरले जातात. तेथील स्थानिकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधला व या व्यवसायाबद्दल माहिती घेतली. वाडी वस्त्यांवरती भेट दिली. (Amit Gorkhe)
यात प्रामुख्याने समाज मंदिर व घरकुलाच्या योजना कशा पोहोचवता येतील या अनुषंगाने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले. या भेटीदरम्यान समाज बांधवांना जवळून भेटण्याचा योग आला, प्रखरतेने सगळ्यांनी आपल्या जिवंत प्रवास उलगडला.
संपूर्ण प्रवासामध्ये प्रत्येकामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा दिसून आली, एक लोकप्रतिनिधी म्हणून अजून काय हवंय..
बहुजन संवाद यात्रा महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र दौरे चालू आहेत , आणि त्याचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे हे पाहून समाधान वाटते.. अशी भावना गोरखे यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार अविनाश घाटे, प्रमोद गायकवाड, सचिन गुंडाळे, रामप्रसाद कदम, उत्तम किसनराव गादगे, सतीश कावडे, गणपत गायकवाड, नागेश काजलापुरकर, राहुल तेलंग, डॉक्टर भगवान सूर्यवंशी, ॲड. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, भारत दाढे आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रभर ही आमदार अमित गोरखे यांची बहुजन संवाद यात्रा चालणार आहे. या त्यांच्या आगळ्या वेगळ्या संवाद यात्रेला राज्यभर बहुजन समाजाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणार
शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका
Accident : नेपाळ बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार
धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश