कष्टकरी कामगार पंचायत वतीने आवाहन
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरातील आंबेडकरी पुरोगामी विचाराच्या सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने दि.-13-6-2023 रोजी दुपारी 3 वाजता आकुर्डी येथील खंडोबा माळ ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात कष्टकरी कामगार पंचायत , महाराष्ट्र रिक्षा पंचायत , टपरी ,पथारी, हातगाडी पंचायत, सफाई कामगार संघटित कामगार कष्टकरी जनतेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून त्यात त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
या आंदोलनामध्ये संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे. पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सर्व आंबेडकरी पुरोगामी विचाराच्या सर्वपक्षीय संघटनेच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.