नांदगाव खंडेश्वर :- शेतकऱ्यांना कागदपत्राची अट घालून कर्जासाठी प्रतीक्षा करावी लागत असेल तर बँकेच्या शाखा व्यवस्थापक वर गुन्हे दाखल करा, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय किसान सभा नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सरकारचे निर्देश असताना ही लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना कागदपत्रांची मागणी करणे चुकीचे आहे शेतकऱ्यांना बिना अट तातडीने कर्ज वाटप करा अशी मागणी किसान सभेने केली आहे.
त्यावेळी किसान सभेचे जिल्हा सहसचिव श्याम शिंदे, तालुका अध्यक्ष अनिल मारोडकर, तालुका सचिव दिलीप महल्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.