Wednesday, November 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आळंदीत पाशांकुश एकादशी दिनी लक्षवेधी पुष्प सजावट

ALANDI : आळंदीत पाशांकुश एकादशी दिनी लक्षवेधी पुष्प सजावट

भाविकांची दर्शनास गर्दी ; इंद्रायणी आरती उत्साहात (ALANDI)

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात एकादशी दिनी लक्षवेधी पुष्प सजावट श्रींचे गाभाऱ्यात करण्यात आली होती. भाविकांनी दर्शनास गर्दी करून श्रींचे दर्शन घेतल्याचे देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. यावेळी इंद्रायणी आरती उत्साहात झाली. (ALANDI)

आळंदी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे वैभवी गाभाऱ्यात विविध रंगी आकर्षक फुलांचा वापर करीत पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिरात एकादशी निमित्त महाप्रसाद आळंदी देवस्थान तर्फे वाटप करण्यात आले.

आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा भाविकांनी गर्दी करून स्थान माहात्म्य जोपासत तीर्थ प्राशन करीत स्थान माहात्म्य जोपाले. वारकरी भाविकांनी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा करीत एकादशी साजरी केली. परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरात धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद, महानैवेद्य झाला. विणा मंडपात हरिकीर्तन सेवा मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून झाली. कीर्तनास भाविकांनी गर्दी केली.

एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरती उत्साहात

तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, आळंदी जनहित फाउंडेशन, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, कल्याणी भालपे, संगीत दळवी, सावित्री घुंडरे, अनिता शिंदे, लता वरतले,शिळा सुर्वे, विमल मुसळे, सरस्वती भागवत, नीता भागवत, भागीरथी भागवत, गोदावरी बिरादार, नीलम कुरधोंडकर, भरती उगले, मुक्ताबाई भोसले, श्वेता भागवत, सुरेख शिंदे, उज्जवल जुमले, शोभा कुलकर्णी, सुनीता माळी, राधा मुंगजाळ, तारा सरोदें, लता बवले, अलका पतंगे, छाया सुरळकर, अनिता गोटमवाड, सुनीता जिंकलवार, सरला वाघ, पुष्पक लेंडघर, सुरेख कुऱ्हाडे, सुनंदा चव्हाण, अरुणा जगताप, नंदा महाडिक, सविता कांबळे, वत्सला दाभाडे, माजी नगरसेविका उषा नरके, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर, आळंदी उपशहर प्रमुख माऊली घुंडरे, गोविंत ठाकूर, अभियंता अजित मेदनकर, कैवल्य टोपे, वैभव दहिफळे आदींसह महिला भाविक, आळंदीकर ग्रामस्थ, उपस्थित होते.

इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले.

इंद्रायणी नदीत निर्माल्यादी वस्तू, कपडे कचरा, तुटलेले फोटो, काचा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी हरित आळंदीसाठी जनजागृती करीत इंद्रायणी नदी घाटात स्वच्छता करण्यात आली. यात महिला भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय