Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : आळंदी कार्तिकी यात्रा काळात भाविकाची गैरसोय टाळणार - प्रांत दौन्डे

Alandi : आळंदी कार्तिकी यात्रा काळात भाविकाची गैरसोय टाळणार – प्रांत दौन्डे

१५ नोव्हेंबर ला इंद्रायणी नदीत पाणी सोडण्याचे आदेश (Alandi)

कार्तिकी यात्रेत आळंदीत २४ तास आरोग्य सेवा कार्यरत रहाणार

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी कार्तिकी यात्रेच्या यावर्षीचे नियोजनावर आचारसंहितेचे सावट असून आळंदी कार्तिकी यात्रा काळात राज्यातून आलेल्या भाविक, नागरिकांचे सुरक्षिततेस प्राधान्य देत नागरी सेवा सुविधा पुरविण्यासाठी नियोजन पूर्व आढावा बैठकीत सर्व शासकीय विभाग प्रमुखांची प्रभावी कामकाज करावे. (Alandi)

आळंदीत नागरिक, भाविक यांच्या सुरक्षेसह आरोग्याची काळजी घेत यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देताना भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचनादेश, प्रभावी नियोजन आणि त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना खेडचे प्रांत अनिल दौन्डे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. (Alandi)

आळंदीत कार्तिकी यात्रा अर्थात माउली’च्या संजीवन समाधी दिन सोहळ्याच्या तयारीचा नियोजन पूर्व आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी दौन्डे यांचे अध्यक्षते खाली आळंदी नगरपरिषद सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी प्रांत दौन्डे यांनी उपस्थित अधिकारी – पदाधिकारी, विविध संस्थांचे मान्यवर, नागरिक यांचेशी सुसंवाद साधून आढावा घेत प्रशासनाला विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केल्या. त्यांनी विविध विभाग प्रमुख यांनी केलेले नियोजन केवळ कागदावर राहणार नाही. याची दक्षता घेऊन दिलेला आढावा तसेच केलेले नियोजन भाविक, नागरिकांचे सेवेसाठी प्राधान्याने कामकाज केले जाईल यासाठी सर्व विभागणी एकमेकांशी तसेच नोडल अधिकारी कर्मचारी यांनी सुसंवाद ठेवण्याचे आदेश खेडचे प्रांत यांनी दिले. वेळ प्रसंगी दोषी यंत्रणेवर तसेच व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे सूचना त्यांनी प्रशंसनास दिल्या.

या बैठकीस परिमंडळ ३ चे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंग गौर, आळंदी पालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर, सेवक राजाभाऊ रंधवे चोपदार, बल्लाळेश्वर वाघमारे, वैद्यकीय अधिकारी इंद्रिरा पारखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, आळंदी मंडलधिकारी राजेंद्र वाघ, गुप्त वार्ता विभागाचे पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, बांधकाम विभाग प्रमुख संजय गिरमे, सचिन गायकवाड, विभाग प्रमुख शिवशरण , माजी विरोधी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, आळंदी शहर शिवसेनेचे प्रमुख राहुल चव्हाण, आळंदी जनहित फाऊंडेशन चे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, संकेत वाघमारे,शाखा प्रमुख रोहिदास कदम, उमेश रानवडे, श्री भैरवनाथ महाराज आळंदी ग्रामस्थ मंडळ कमेटीचे अध्यक्ष शंकरराव कु-हाडे, आळंदी देवस्थान, वीज वितरण, पाटबंधारे विभाग, आरोग्य, एस.टी महामंडळ सेवा, सार्वजनिक वाहतूक सेवा, पीएमपीएल, पाणी पुरवठा, महसूल, पोलीस, आळंदी ग्रामीण रुग्णालय आदी खात्यांचे शासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलिस , खेड महसूल, वीज वितरण, आरोग्य व पाणी पुरवठा विभाग अशा विविध शासकीय तसेच अशासकीय संस्थांनी आळंदी कार्तिकी यात्रे बाबतचा नियोजन पूर्व आढावा प्रांत दौन्डे यांनी सुसंवाद साधत घेतला.

यावेळी यापूर्वीचे यात्रांचा तसेच येणाऱ्या कार्तिकी यात्रेस नेहमी पेक्षा गर्दी जास्त होण्याची शक्यता देवस्थान ने वर्तवली आहे. त्यानुसार गर्दीवर नियंत्रण आणि सेवा सुविधा यावर उपाय योजना आढावा सविस्तर घेण्यात आला. नगरप्रदक्षिणा मार्गावर फुटपाथ वर पथारीवाले यांचे मुळे गैरसोय होवून रहदारीला अडथळा व भाविकांच्या रहदारीला प्रदक्षिणेस गर्दी मुळे गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि फुटपाथ अतिक्रमण मुक्त राहतील असे नियोजन केले जाईल. तसेच यात्राकाळात नियमित अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु रहाणार असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. (Alandi)

पोलिस प्रशासनाने सुरळीत वाहतुकीचे नियोजन, वाहन पार्किंग, पास वाटप प्रभावी बंदोबस्त नियोजन केले असल्याचे सांगितले. यावेळी सुसंवाद साधत प्रांत दौन्डे यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक विभागाने आपापले नियोजनाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी नियोजन पूर्व आढावा त्यांनी घेतला. (Alandi)

आळंदीत २३ नोव्हेंबर पासून गर्दीला सुरुवात होणार आहे. २६ नोव्हेंबर पासून सुरु झालेले आळंदी कार्तिकी यात्रेचे परंपरेचे उपक्रम १ डिसेम्बर २०२४ पर्यंत सुरु राहतील. २३ नोव्हेंबर ला श्रीगुरु हैबतबाबा यांचे पायरी पूजनाने सोहळ्यास प्रारंभ होईल. २६ डिसेम्बर ला कार्तिकी एकादशी, २८ डिसेंबरला श्रींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी आळंदी देवस्थानचे कार्यक्रमात सांगितले. परंपरेने भाविकांचे स्वागत देवस्थान तर्फे केले जाईल.

मंदिर व परिसरात भाविकांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे त्यांनी सांगितले.

२१ नोव्हेंबर पूर्वी भाविक नागरिक यांना विविध नागरी सेवा सुविधा देण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारी, विभाग प्रमुख यांनी बैठकीत सादर केलेल्या नियोजना प्रमाणे कामकाज करण्याचे सूचना देत नियोजना प्रमाणे कामकाज करण्यास दक्षता घेण्याचे आवाहन प्रांत दौन्डे यांनी केले.
यात्रा काळात भाविक नागरिकाना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी नियोजनाचा आढावा घेत सूचना करीत त्यांनी अधिकारी आणि उपस्थित मान्यवर यांचेशी सुसंवाद साधला.

यात्रा काळात भाविक – नागरिक यांचे सुरक्षेस आणि आरोग्य सेवा, वीज, पाणी याबाबत माहिती घेत सेवा देण्यास त्यांनी कामकाज करावे असे आवाहन केले. यावेळी माजी नगरसेवक डी.डी भोसले पाटील यांनी विविध समस्यां अडचणी आणि सेवा सुविधा बाबत निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधत संवाद साधला. यावेळी उपस्थित अधिकारी यांनी कामकाजाचा आढावा देत माहिती दिली. इंद्रायणी नदीत वरील धरणातून १५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाणी सोडण्यास सूचनादेश देण्यात आले आहेत. २० नोव्हेंबर पूर्वी आळंदीत नदीला पुरेशा प्रमाणात पाणी राहील याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

यामुळे भाविकांचे स्नानाची सोया होणार आहे. यात्रा काळात वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी दक्षता घेतली जाईल असे वीज महावितरण कडून ग्वाही देण्यात आली आहे. यात्रा काळात भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालय २४ तास सुरु रहाणार आहे. यासाठी यंत्रणा अधिकचे कर्मचारी तैनात केले जाणार असल्याचे आरोग्य सेवेच्या प्रशासनाने सांगितले. यात्रा काळात पाणी नमुने घेऊन आणि हॉटेलसह कामगारांचे आरोग्याची तपासणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.

प्रास्ताविक मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले. आभार प्रांत अनिल दौन्डे यांनी मानले. विविध मान्यवरांनी चर्चेत सहभागी होऊन संवाद साधला.

संबंधित लेख

लोकप्रिय