निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी शहर पथविक्रेता समितीच्या एकूण २० सदस्यां पैकी ८ सदस्य हे शहरातील नोंदणीकृत ३६५ पथ विक्रेत्यांकडून निवडले जाणार आहेत. (ALANDI)
यासाठी निवडणुकी मंगळवारी ( दि. २७ ) आळंदी नगरपरिषद कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात एकूण ८ जागां पैकी ३ जागा महिला पथ विक्रेत्यां करिता आरक्षित असून त्यात अल्पसंख्यांक महिलांसाठी १ आणि इतर मागास प्रवर्ग महिलासाठी १ आणि खुला प्रवर्ग महिला साठी १ यानुसार आरक्षण सोडतीत निश्चित झाल्याचे मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद तथा निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.
आरक्षण सोडत कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे यांनी आळंदी शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात निवडणुका २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी, अर्ज माघारी घेणे यासाठी निर्धारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आवश्यकते नुसार मतदान आणि त्यानंतर मतमोजणीतून विजयी उमेदवार घोषित केले जातील. (ALANDI)
यावेळी पथ विक्रेते संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मल्हार काळे म्हणाले, शक्यतो निवडणूक दोन्ही संघटना आणि पथ विक्रेते यांना विश्वासात घेऊन बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.