Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आळंदीत २७५ रक्तदात्यांचे रक्तदान ; आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

ALANDI : आळंदीत २७५ रक्तदात्यांचे रक्तदान ; आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील श्री आळंदी धाम सेवा समितीचे वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरास मोठा प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित नेत्रतपासणी शिबिरात ३२१ जणांची तपासणी करण्यात आली. Alandi

यात २११ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह चष्मे वाटप करण्यात आल्याचे संयोजक समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी सांगितले. रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी योगी निरंजननाथ, नितीन गोरे, डी. डी. भोसले, डॉ. राम गावडे, प्रकाश वाडेकर, सतीष मोटे, ज्ञानेश्वर वीर, सचिन गिलबिले, महेश शेवकरी, प्रकाश कुऱ्हाडे, मोहन महाराज शिंदे, किरण येळवंडे, सचिन काळे, सुनील काटे, धनंजय पठारे, रमेश वहीले, वंदना आल्हाट, संकेत वाघमारे, मनोहर दिवाणे, साईनाथ ताम्हणे, नितीन ननवरे, किशोर देशपांडे, शशिकांत बाबर, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर घुंडरे, दिनकर तांबे, रोहिदास कदम, राजेश नागरे, प्रदिप तळेकर, धनंजय मुंगसे, परसराम धनवडे, अक्षय पाटील, अजय पवार, सुयोग भालेकर आदी उपस्थित होते. Alandi

रक्तदान व आरोग्य शिबिरास कमलेश हाॅस्पीपल, चव्हाण हाॅस्पीपल, धारा हाॅस्पीपल, सुर्या नेत्रालय तसेच वेदश्री तपोवन यांचे सहकार्य मिळाले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करीत उपक्रमाचे कौतुक केले. केले. या शिबिरात महिलांनी देखील उत्साही प्रतिसाद देत रक्तदान केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती

वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

संबंधित लेख

लोकप्रिय