Wednesday, May 8, 2024
Homeग्रामीणअकोले : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची तहसील कचेरीसमोर निदर्शने

अकोले : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची तहसील कचेरीसमोर निदर्शने

 

महागाई विरोधात कम्युनिस्ट पक्ष आक्रमक

राजूर / डॉली डगळे : अकोले तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष अकोले तालुकाच्या वतीने मोदी सरकार भाजपाच्या विरोधात “मोदी चले जाव” घोषणा देत महागाईस कारणीभूत ठरलेल्या केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान या मोर्चात आंदोलकांनी प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदारांना यांना देण्यात आले. 

या आंदोलनात कॉ.कारभारी उगले, कॉ.लक्ष्मण नवले, व्ही.बी.नवले, रामदास चौधरी, भास्कार खांडगे, कॉ.ओंकार नवाळी यांच्यासह भाकपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

■ आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● गैस सिंलेडरच्या किंमती कमी करून त्यावरील सबसिडी पुन्हा सुरू करा.

● गरीबांची चेष्टा व फसवणूक करणारी उज्वला गैस योजनेच्या लाभार्थ्यांना व इतर सर्वसामान्य जनतेला रॉकेल मुक्तीच्या नावाखाली बंद केलेला केरोसीन पुरवढा पुन्हा सुरू करा.

● रेशन दुकानातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्यात यावे.

● प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रूपये अर्थिक मदत करा.

● खते व बी बियाणे क्रूषी विषयक साहित्यावरील जी.एस.टी.मुक्त करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय