Sunday, May 19, 2024
Homeराजकारणपार्थ पवारांच्या उमेदवारी देण्याविषयी अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका. वाचा सविस्तर

पार्थ पवारांच्या उमेदवारी देण्याविषयी अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका. वाचा सविस्तर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे जनमान्य नेतृत्व आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीवरुन चर्चेला उधाण आले आहे. पंढरपूर – मगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवार दिली जाणार असल्याची चर्चेला उधाण आले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केले.

 

अजित पवार म्हणाले, पंढरपूर – मगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे वृत्त निराधार, तथ्यहि आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना व महाविकास आघाडीतील मित्र पक्षांंशी चर्चा करुन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व निवड समिती उमेदवार निश्चित करतील.

 

तसेच पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, स्वर्गीय आमदार भारत भालके यांचं निधन पक्षासाठी मोठा धक्का आहे. त्याच्या निधनमुळे होत असलेली महाविकास आघाडीची पहिलीच पोटनिवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय