Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAJIT GAVHANE : जाधववाडीतील नागरिक दडपशाही मोडून काढण्यासाठी परिवर्तन घडविणार - अजित...

AJIT GAVHANE : जाधववाडीतील नागरिक दडपशाही मोडून काढण्यासाठी परिवर्तन घडविणार – अजित गव्हाणे

जमिनी विकण्यासाठी जाधववाडीतील शेतकऱ्यांवर दडपशाहीचा अवलंब- अजित गव्हाणे (AJIT GAVHANE)

रस्त्यांसाठी अडवणूक ; नागरिकांमध्ये सुप्त संतापाची लाट

परिवर्तनाचा चेहरा होण्याची संधी महाविकास आघाडीने दिली – अजित गव्हाणे

परिवर्तनातून भोसरी मतदार संघाचा विकास- अजित गव्हाणे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – जाधववाडीतील अनेक लोकांनी माझ्या कानावर अनेक गोष्टी घातल्या. इथे भूमिपुत्रांच्या जमिनी महापालिकेतील विविध आरक्षणे, रस्ते तसेच प्रकल्पांसाठी ताब्यात घेतल्या गेल्या. उर्वरित जागांचा विकास व्हावा अशी माफक अपेक्षा नागरिकांची असताना विविध कारणांनी दडपशाही केली गेली. मंजूर केलेले रस्ते ‘शिफ्ट ‘करण्यात आले. शेतकऱ्यांना जमिनी विकण्यासाठी प्रवृत्त करण्याची दडपशाही सध्या सुरू आहे. (AJIT GAVHANE)

मात्र आता अशी दडपशाही चालू देणार नाही नाही. या दडपशाही विरोधातच नागरिक परिवर्तनाच्या मनस्थितीत असल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मंगळवारी सांगितले. या परिवर्तनातून मतदार संघाचा विकास होणार असल्याचे देखील अजित गव्हाणे यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीतील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ जाधववाडी येथे मंगळवारी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधववाडी परिसरातील जेष्ठ नागरिक, येथील रहिवासी तसेच महाविकास आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. प्रचाराच्या निमित्ताने सावता माळी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. वाडा बोल्हाई मळा, जय बजरंग मित्र मंडळ, आहेरवाडी तालीम, सुभाष मित्र मंडळ, काळुबाई मंदिर कमान, आहेरवाडी चौक येथील नागरिकांची या दौऱ्यात भेट घेण्यात आली.

अजित गव्हाणे म्हणाले दहा वर्ष आपण ज्यांना नेतृत्व दिले त्यांनी आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये नागरिक परिवर्तनाच्या मनस्थितीत होते, ही परिस्थिती वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत जात होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मला संधी दिली. महाविकास आघाडीतील शिवसेना ,काँग्रेस तसेच घटक पक्षातील नेते तसेच स्थानिक सर्व सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यामुळेच या संघर्षाच्या लढाईचे बळ मिळाले आहे.यामध्ये तुम्हा नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

अजित गव्हाणे पुढे म्हणाले जाधववाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मी फिरत आहे. अनेक परिवारातील लोकं मला येऊन भेटत आहेत. माझ्या कानावर काही गोष्टी त्यांनी घातल्या. या भागामध्ये ज्या भूमीपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून येथील रस्ते, विविध प्रकल्प, आरक्षणे विकसित होत आहेत. त्या शेतकऱ्यांनाच दडपशाहीच्या माध्यमातून जमिनी विकण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.

हे करताना जागोजागी अडवणूक सुरू आहे. जे रस्ते मंजूर केले त्या रस्त्यांना शिफ्ट केले जात आहे. या दडपशाही मुळे नागरिकांमध्ये प्रचंड सुप्त संताप निर्माण झालेला आहे .हा संताप परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.


गेल्या दहा वर्षातील नियोजनाच्या अभावामुळे
जाधववाडी परिसरामधील खंडित वीज पुरवठ्याची समस्या सुटलेली नाही. या भागात प्रचंड नागरिकरण वाढत असताना वीज पुरवठ्याबाबत सक्षम यंत्रणा उभारण्याबाबत गेल्या दहा वर्षात ठोस उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते. या भागात ट्रान्सफॉर्मर वाढवणे गरजेचे आहे.

मात्र अपुऱ्या यंत्रणेवर अजूनही वीज पुरवठा होत असल्यामुळे वीज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी येथील नागरिकांच्या आहेत. आगामी काळात नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करणे, वीज वितरण विभागाचे सक्षमीकरण या गोष्टींसाठी प्राधान्य देण्यात येईल. असे अजित गव्हाणे म्हणाले.

महाविकास आघाडीने विश्वास टाकला . या मतदारसंघातून उमेदवारीची संधी नागरिकांच्या विश्वासातून मिळाली आहे. या मतदारसंघात जनतेने निवडणूक हातात घेतली आहे .प्रत्येक जण स्वतः उमेदवार असल्याच्या भावनेतून काम करत आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे.

अजित गव्हाणे
उमेदवार महाविकास आघाडी
भोसरी, विधानसभा मतदारसंघ

संबंधित लेख

लोकप्रिय