नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवर्तनसाठी नागरिक ठाम (Ajit Gavhane)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी शनिवारी गाठीभेटींवर भर दिला. भोसरी मतदारसंघातील पक्षाचे जुने पदाधिकारी,नागरिक, कामगार ,मित्र परिवार यांच्या गाठीभेटी घेत येत्या 20 नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्ह समोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले. (Ajit Gavhane)
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी शनिवारी गाठीभेटीं घेतल्या. भोसरी मतदारसंघातील परिवर्तन का आवश्यक आहे हे देखील त्यांनी सांगितले. पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, मित्रपरिवार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मतदानासाठी आवाहन केले.
अजित गव्हाणे यावेळी म्हणाले गेली 20 वर्षापासून मी नगरसेवक म्हणून काम करत आहे. यापूर्वी देखील विधानसभा निवडणुकीसाठी मला विचारणा करण्यात आली होती. आता परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाला त्रास होत आहे. या विरोधात प्रत्येक जण पुढे आला आणि त्यांचा फक्त चेहरा मी झालो. या शहरामध्ये विकासाचे, विस्तारीकरणाचे प्रचंड ”पोटेन्शिअल” आहे.
कारखानदारी, चांगल्या सुविधा, प्रशस्त रस्ते या माध्यमातून या शहराने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र गेल्या दहा वर्षात ही ओळख पुसण्याचे काम कुठेतरी होत आहे. त्यामुळे मला पुढे येण्यासाठी अनेकांकडून सांगण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संधी दिली. एक व्यक्ती नाही तर प्रवृत्तीच्या विरोधात माझी लढाई सुरू आहे. माझ्याशी या लढाईत प्रत्येक जण जोडला जात आहे. कारण प्रत्येक जण गेल्या दहा वर्षात कोणत्या ना कोणत्या त्रासाला सामोरा गेला आहे असे यावेळी अजित गव्हाणे म्हणाले. (Ajit Gavhane)
दरम्यान अजित गव्हाणे यांना पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे.बहुजन कल्याण सेना महाराष्ट्र यांच्या वतीने बी. के. भालेराव, मुकुंद भालेराव, गीता बल्लाळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. जनशक्ती सामाजिक सेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप शेंबडे यांनी देखील अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांचा कणा कोलमडतोय
पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या अडीच वर्षाहून अधिक काळ प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. कोणतीही सभा होत नाही. एकाच वेळेला स्थायी समिती, सर्वसाधारण सभा, वेगवेगळ्या विषय समित्यांच्या सभा होतात. कोणाच्यातरी दबावाखाली ठराविक विषयांना मंजुरी दिली जाते, त्यातून शहराचे वाटोळे होत आहे. राज्यातील काही महापालिकांमध्ये तर पूर्ण पाच वर्षांची टर्म निघून गेली पण स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका झाल्या नाही. ही एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कणा कोलमडत असून या विरोधात नागरिकांनीच आता पुढे येणे गरजेचे आहे.
अजित गव्हाणे
उमेदवार महाविकास आघाडी
भोसरी विधानसभा मतदारसंघ