प्रतिनिधी :- लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातला शेतकरी उध्वस्त झाला असून शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून केंद्र आणि राज्यानी कृषी उत्पादन सेवा अत्यावश्यक सेवेत आणली असताना भाजीपाला, शेतकऱ्यांची अवजारे, बी-बियाणे, खताची दुकाने, जनावरांचे खाद्य विक्री केंद्र पोलीसबळाचा वापर करून स्थानिक प्रशासनाने बंद केली आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकजूट करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी, कार्याध्यक्षपदी स्वामींनाथ हरवाळकर तर सचिवपदी दयानंद फताटे यांची निवड करण्यात आले आहे.
शेतकरीविरोधात धोरणांचा विरोध करण्यासाठी या समितीच्या माध्यमातून सोलापूरातील ११ तालुक्यात काम केले जाणार असल्याचे कलशेट्टी यांनी सांगितले.