संग्रामपूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनानुसार संग्रामपूर तालुका किसान सभेच्या वतीने दि १८ संप्टेबर रोजी पातुर्डा फाटा वतीने शेतकऱ्याच्या ज्वलंत व तातडीच्या प्रश्नावर जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले. AIKS Kisan Sabha protest at Paturda Phata
सरसकट पिक विमा तातडीने शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा, अतिवृष्टीमुळे घरांचे व शेतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या, ऑगस्ट मध्ये पावसाने दडी मारल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले सरसकट आर्थिक मदत द्या, सर्वांना रेशन चे धान्य वाटप करा, वन जमिन गायरान जमिन कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावे करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. अनिल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष कॉ. रामेश्वर काळे, तालुका सचिव कॉ. शेख अकबर, कॉ.शेख जावेद, कॉ. मुंकुंद फेरण, कॉ. संतोष पाटील, कॉ. फकीरा वानखडे, कॉ. शेख मेहबुब, कॉ. शेगोकार, कॉ. श्रीकृष्ण गायकी इत्यादी केले.