Friday, November 22, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी या कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह; कृषि अधिक्षकांचे सहभागी ...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी या कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह; कृषि अधिक्षकांचे सहभागी होण्याचे आवाहन.

कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी १ जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. १ ते ७ जुलै २०२० या कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सुचनांनुसार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यंदाच्या वर्षी पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्याचे उत्पन्नवाढ या त्रिसुत्रीचा अवलंब कृषि विभाग करणार आहे. खरीप हंगाम २०२० यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद साधणार आहेत. 

कृषि तंत्रज्ञानाचा छोटासा अवलंब पिक उत्पादन वाढीमध्ये मोठा परीणाम करू शकतो. या अनुषंगाने परिणामकारक प्रचार व जनजागृती करण्यासाठी १ ते ७ जुलै २०२० या कालावधीत कृषि व संलग्न विभागाच्या सहभागातून कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मास्तोळी यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय