Thursday, November 21, 2024
Homeजुन्नरJunnar : शिवजन्मभूमीत रंगला २४ वर्षानंतर ब्रह्मनाथ विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

Junnar : शिवजन्मभूमीत रंगला २४ वर्षानंतर ब्रह्मनाथ विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

जुन्नर / आनंद कांबळे : तीर्थक्षेत्र पारुंडे (ता.जुन्नर) येथील श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिराच्या सन २०००च्या एस. एस.सी. च्या विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी लॉन मध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. (Junnar)

तब्बल २४ वर्षानंतर हे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक एकमेकांना भेटत होते. मुलांचे चेहरे फक्त ओळखीचे वाटत होते परंतु नावांसह आठवणींना उजाळा देताना शिक्षकांची देखील तारांबळ होत होती. मन हेलावून टाकणारा, गप्पा गोष्टी, व आठवणीने संपूर्ण हॉल भारावून गेला होता. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने माजी मुख्याध्यापक वसंत पवार, सखाराम ससाणे, भगवान जुन्नरकर, फकीर आतार, अंजाभाऊ तांबडे, याकुब शेख दत्तात्रय अरकडे या मुख्याध्यापकांबरोबर बबनराव पाचपुते, कैलास दाभाडे, मंदाकिनी पवार, मंगल तांबे या शिक्षकांसह काशिनाथ आनंदराव, आनंदा मोदे, हरिश्चंद्र जाधव, गोल्हार मॅडम, उज्वला पटेकर हे सहकार्य देखील आवर्जून उपस्थित होते. शालेय जीवनातील जुन्या आठवणी, किस्से मुले सांगताना सर्वजन मंत्रमुग्ध होऊन गेले होते. (Junnar)

फुलांच्या पायघड्यावरून सर्व गुरुजन चालत – चालत, सुमधुर संगीताच्या स्वरात व टाळ्यांच्या गजरात भव्य स्वागतासह लॉन्स मध्ये प्रवेश करीत होते. स्वागत गीताने मानवंदना देत विद्यार्थिनींनी सर्व गुरुजनांना कुमकुम तिलक लावून, पूजन करून गुरुदक्षिणा देत दर्शन घेतले.

अनेक विद्यार्थ्यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. आठवनिणाना उजाळा दिला. हा स्नेह मेळावा नियोजन पूर्वक यशस्वी होण्यासाठी अर्चना लामखेडे, विजय पवार, नंदाराम टेकवडे, सारिका नलावडे, सीमा चव्हाण, अश्विनी डफळ, वैशाली वायकर, ललिता नायकोडी त्याचप्रमाणे निलेश सांबरे, अमोल फापाळे, तुषार पवार, अतुल पुंडे, प्रदीप पवार, राजू बाळसराफ, गणेश पवार, प्रविण भांगे, विशाल बुरडे यांनी खूप मेहनत घेतली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्व मित्रांना एक झाड देऊन संगोपन करण्याची विनंती केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार व अर्चना लामखडे यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक कैलास दाभाडे यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत आभार मानले. वंदे मातरम या राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम व स्नेहभोजनानंतर अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी

जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

आयुक्त शेखर सिंह यांच्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केली, राहत्या घराची स्वच्छता

संबंधित लेख

लोकप्रिय