Friday, November 22, 2024
Homeक्रीडाविश्व२२ दिवसांनंतर आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंचा संयम सुटला; ब्रिजभूषण सिंहांविरोधात उचललं 'हे' मोठं...

२२ दिवसांनंतर आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंचा संयम सुटला; ब्रिजभूषण सिंहांविरोधात उचललं ‘हे’ मोठं पाऊल

पुणे : दिल्लीच्या जंतरमंतरवर मागील २२ दिवसांनंतरही कुस्तीपटूंचं आंदोलन सुरुच आहे.आंदोलक बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत हे आंदोलन छेडले आहे.महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंहांवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. या आंदोलनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

क्रीडापटूंकडून सुरु असलेल्या आंदोलनाला 22 दिवस उलटले तरी अद्यापही आंदोलन(Protest)कर्त्यांपर्यंत कुणीच पोहचले नाही. त्यामुळे आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही अशी खंतही या क्रीडापटूंनी व्यक्त केली. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्ती महासंघाच्या संपूर्ण मंडळाचे झालेले विसर्जन हा आपला पहिला विजय असल्याचं सांगितलं.

याचवेळी महिला कुस्तीपटूंनी रविवारी((दि.१४) पत्रकार परिषदेत खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपच्या इतर 41 महिला नेत्यांना पत्र लिहून आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.त्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय