Saturday, May 18, 2024
Homeबॉलिवूडशाहरुखच्या जवान चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींग सुरू, चित्रपटाने केली रेकॉर्डब्रेक कमाई

शाहरुखच्या जवान चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींग सुरू, चित्रपटाने केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ चित्रपट 7 सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी चाहते आतूर झाले. जवान चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींग सुरू झाले असून चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानंतर आता शाहरुखचा ‘जवान’ रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जवान’च्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी चाहते आतूर असून तिकीट खरेदीही (Jawan Movie Advance Booking) रेकॉर्ड ब्रेक सुरु आहे. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकींग 1 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. जवान चित्रपटाने अॅडव्हान्स बुकींगमध्ये रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जवान चित्रपटाची 2 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 2 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली. पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) ची 168,000 तिकीटे आणि सिनेपॉलिस (Cinepolis) मध्ये 35,300 तिकीटांची अॅडव्हान्स बुकींग झाली आहे. ‘जवान’ चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच ‘पठाण’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

दरम्यान, दुबईतील बुर्ज खलीफावर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यामुळे ‘जवान’ किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय