Friday, November 22, 2024
Homeजिल्हाभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या चांदवड तालुका सचिवपदी ॲड.गणेश ठाकरे

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या चांदवड तालुका सचिवपदी ॲड.गणेश ठाकरे

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्ष चांदवड तालुका अधिवेशन आयटक कामगार केंद्र चांदवड येथे रेणुका कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आले. भाकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव कॉम्रेड भास्कर शिंदे उपस्थित होते. तालुक्याचा आढावा 3 वर्ष चा किरण डावखर यांनी मांडला. पक्ष व जन संघटनांची चर्चा झाली. भाकप चांदवड तालुका पदाधिकारी 3 वर्ष साठी निवड करण्यात आली.

तालुका सचिव पदी ॲड.गणेश ठाकरे सहसचिव पदी रमेश क्षीरसागर, लक्ष्मण आहेर, चांदवड सचिव पदी ॲड. दत्तात्रय गांगुर्डे, सहसचिव शेख गुरुजी तालुका सदस्य पदी रमजान पठाण, रामुतात्या ठोबरे, सुखदेव केदारे किरण डावखर, देविदास पोटे, अण्णा जिरे, भास्कर शिंदे, शबु पुरकर, दशरथ कोतवाल यांची निवड करण्यात आली.

कोरोना योध्या चांदवड शहरातील आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी यांचा भाकप वतीने सन्मानपत्र फुल देऊन सन्मान करण्यात आला. 10 सप्टेंबर रोजी जिल्हा अधिवेशन नाशिक साठी प्रतिनिधी निवड करण्यात आली. तसेच 18, 19, 20 सप्टेंबर अमरावती राज्य अधिवेशन साठी निवड करण्यात आली. तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद , चांदवड नगर पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी, कामगार, जनतेच्या प्रश्नावर व्यापक चळवळ लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख

लोकप्रिय