Friday, November 22, 2024
Homeआंबेगावआदिवासी सेवक शंकर विठू केंगले स्मृती पुरस्कार जाहीर; ‌‌"यांना" दिला जाणारा पुरस्कार

आदिवासी सेवक शंकर विठू केंगले स्मृती पुरस्कार जाहीर; ‌‌”यांना” दिला जाणारा पुरस्कार

घोडेगाव : आदिवासी सेवक, शंकर विठू केंगले यांचे आंबेगाव तालुक्यातील, सर्व- सामान्य जनतेसाठी विशेष योगदान आहे. विशेषतः आदिवासी समुदायासाठी, आदिवासी भागासाठी त्यांनी केलेले काम हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी दिलेले आदिवासी प्रश्नावरील लढे हे सतत प्रेरणा देणारे ठरावे यासाठी त्यांच्या नावाने स्मृती पुरस्कार, आखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समिती यांच्या वतीने, गेल्या तीन वर्षांपासून देणे सुरु आहे.  Adivasi Sevak Shankar Vithu Kengle Commemorative Award announced

सन 2023 वर्षाचा, हा स्मृती पुरस्कार कॉम.रामकृष्ण बोऱ्हाडे (ज्येष्ठ कामगार नेते) व निसर्गवासी श्रीमती बबाबाई श्रावण केंगले (सामाजिक कार्यकर्त्या) यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती श्रीमती जागृती कुमरे (उपायुक्त आदिवासी विकास विभाग, अमरावती), कार्यक्रमाचे अध्यक्ष. ॲड. बाळासाहेब बाणखेले (ज्येष्ठ कामगार नेते) हे असणार आहे.

या कार्यक्रमात ‘भारतीय संविधान, लोकशाही आणि आजची आव्हाने’ या विषयावर डॉ. विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान होणार आहे. या सोहळ्यासाठी तालुक्यातील सजग नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन, आखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समितीने केले आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन किसान सभेची तालुका समितीचे पदाधिकारी नंदाताई मोरमारे, बाळु काठे, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, सुभाष भोकटे, पुंडलिक असवले, देविका भोकटे, दत्ता गवारी, अर्जुन काळे, लक्ष्मण मावळे, कमल बांबळे, शंकर काठे, अशोक जोशी व जिल्हा समितीचे पदाधिकारी राजु घोडे, अशोक पेकारी इ. करत आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय