Tuesday, May 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअदानींच्या मालकीच्या चॅनलने शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे- तृणमूल खासदार महुआ...

अदानींच्या मालकीच्या चॅनलने शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे- तृणमूल खासदार महुआ मोईत्रा

शरद पवार यांच्या परखड वक्तव्याने विरोधी आघाडीत खळबळ

नवी दिल्ली
:अमेरिकेतील शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालावरून अदानी समूहाच्या संसदीय चौकशीसाठी विरोधकांची मोहीम फेटाळून लावली आहे.अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नसून सुप्रीम कोर्टाच्या समितीकडूनच चौकशी व्हायला हवी. अशी स्पष्ट भूमिका अदानी उद्योगसमुहाच्या मालकीच्या चॅनलला मुलाखत देताना शरद पवार यांनी घेतली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अडचणीत सापडलेले उद्योगपती गौतम अदानी यांचे समर्थन केले आहे.अदानी समूहाच्या संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी अशी भूमिका १९ विरोधी पक्षांनी घेतली आहे.त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे

.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेला छेद देणारी शरद पवार यांच्या मुलाखतीमुळे विरोधी आघाडीत खळबळ उडाली आहे.काँग्रेस सहित दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी हिंडेंबर्ग अहवाल जाहीर झाल्यावर व्यापक आंदोलने करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे.मात्र गौतम अदानी आणि पवार कुटुंबांचे संबंध गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहेत.

इतकेच नव्हे तर व्यासपीठावर कार्पोरेट विरोधी राजकीय वक्तव्ये करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सरकारांनी अदानी उद्योगाचे मोठे प्रकल्प त्या त्या राज्यात आणले आहेत.
२००६ साली मनमोहनसिंग सरकारने मुंद्रा येथे सेझ स्थापन करायला अदानी ग्रुपला विविध परवानग्या दिल्या.२०१४ पूर्वी काँग्रेसच्या अशोक गहलोत सरकारने राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्डाबरोबर करार केला आहे.सोलार पार्कसाठी१६०० हेक्टर जमीन भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय अशोक गेहलोत सरकारने घेतला आहे.

ममता बॅनर्जी यांनी अदानींना बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रित केले होते.तसेच अदानी समूहाने महाराष्ट्र ओडिशा आणि छत्तीसगड या राज्य सरकारांशी खाण,खनिज उद्योग विकासासाठी देखील करार केला आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिघी बंदर ७५० कोटीच्या कराराने अदानी उद्योगसमूहास दिले आहे.अदानी उद्योग समूहाचा विस्तार २००४ नंतर काँगेस प्रणित यूपीएच्या सरकारच्या काळात झालेला आहे.असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या खास मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी आपले विचार मांडले. दिग्गज नेत्याच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा म्हणाले,”अदानींच्या मालकीचे चॅनल अदानींच्या मित्रांची मुलाखत घेत आहे. भारतीय मीडिया चिरंजीव खरोखर दुर्मिळ प्रजाती आहात.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय