Adani Group : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) अदानी समूहाच्या सहा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कंपन्यांना व्यवहारांचे कथित उल्लंघन, सूचीकरणाच्या नियमांचे पालन न करणे आणि ऑडिटर प्रमाणपत्रांची वैधता यासंबंधी आरोप करण्यात आले आहे. हिंडनबर्गमुळे वादात सापडलेले भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी पुन्हा चर्चेत आले आहे.
भारत आणि आशियातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने गुरुवारी सांगितले की, 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीसाठी त्यांना दोन कारणे दाखवा नोटीस मिळाल्या आहेत. याशिवाय अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी विल्मार आणि अदानी टोटल गॅस या समूहातील इतर कंपन्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या नोटिसमध्ये कंपन्यांनी रिलेटेड पार्टी व्यवहारांच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासंबंधीच्या काही शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुलासा मागवण्यात आला आहे. SEBI ने या समूहातील 6 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चच्या एका अहवालाने अदानी अडचणीत सापडले होते. सर्वोच्च न्यायालयाने सेबीला या प्रकरणात अदानी समूहातील कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सेबीच्या चौकशीच्या संदर्भात गौतम अदानी समूहाच्या सहा कंपन्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
Adani Group च्या या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी विल्मार आणि अदानी टोटल गॅस या समूहातील इतर कंपन्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात
लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू
मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल
ब्रेकिंग : सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉफ्टर क्रॅश
MPSC च्या रखडलेल्या तारखांबाबत मोठी अपडेट, वाचा !