Friday, November 22, 2024
Homeबॉलिवूडअभिनेते अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांना कोरोनाची लागण

अभिनेते अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांना कोरोनाची लागण

Actor Anupam Kher's mother Dulari contracted corona

(मुंबई):- बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या आई दुलारी, भाऊ राजू त्यांची मेहुणी रीमा आणि भाची वृंदा यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतं आहे. स्वतः अनुपम खेर यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली.

      या संबंधी अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यांनी सांगितले की त्यांचा कोरोना चाचणी अहवाल जरी निगेटिव्ह आला असला तरी त्यांच्या आई, भाऊ, मेहुणी आणि भाची यांचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. त्या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यामध्ये सौम्य कोरोना ची लक्षणे आढळले आहेत असंही त्यांनी सांगितले.

      अनुपम खेर यांच्या आईला मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कुटुंबातील बाकीचे सदस्य घरातच विलगीकरन होऊन उपचार घेत आहेत.

    या व्हिडिओ च्या शेवटी अनुपम खेर यांनी डॉक्टरांचे आणि मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच आता आपल्या भावाच्या संपूर्ण घराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे, असंही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय