पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि बेसिक्स संस्था व अभिराज फाउंडेशन यांच्या वतीने आनंदवन दापोडी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. (Abhisar faundation)
यावेळी टीम बेसिक्स द्वारे नागरिकांना “वृक्ष लावा वृक्ष जगवा” असा संदेश देण्यात आला. यावेळी “अभिसार फाउंडेशन” चे रमेश मुसूडगे यांनी वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान याविषयी माहिती दिली.
या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आनंदवन मधील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेसिक्स संस्थेचे राहुल इंगळे, मंगेश साळवे, कृष्णा रोकडे यांनी परिश्रम घेतले. (Abhisar faundation)
अभिसार फाउंडेशनचे रमेश मुसूडगे व बेसिक्स संस्थेचे राहुल इंगळे यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.