Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसोसायटी धारकांच्या कचरा समस्यासाठी आप भर पावसात रस्त्यावर

सोसायटी धारकांच्या कचरा समस्यासाठी आप भर पावसात रस्त्यावर

पिंपरी चिंचवड (क्रांतिकुमार कडुलकर) : भर पावसात आम आदमी पार्टीच्या वतीने सोसायटी धारकांच्या कचरा समस्यावर आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या Solid Waste Management Rules, 2016 च्या कायद्याचा आधार घेत आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील १०० किलो पेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसाट्यामधील कचरा ३१ ऑक्टोबर २०२२ नंतर न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवडच्या वतीने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.

१. २०१६ साली Solid Waste Management Rules, 2016 चा कायदा अंमलात आल्यानंतर ज्या प्रशासकीय अधिकाऱ्याने सोसायटी मध्ये इन-हाउस कंपोस्टिंग युनिट नसताना सुद्धा सदर सोसायटी बिल्डर ला Completion Certificate दिले त्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.

२. २०१६ नंतर च्या बिल्डर आणि प्रशासनाच्या चुकांचा भुर्दंड सोसायटी धारकांनी का सोसायचा म्हणून सोसायटी मधील इन-हाउस कंपोस्टिंग युनिट बिल्डर मार्फत किंवा स्वतः पालिकेने स्वखर्चातून उभे करावे.

३. २०१६ आधी निर्माण झालेल्या सोसायट्यांसाठी पालिकेने ३१ मार्च २०२३ पर्यंत इन-हाउस कंपोस्टिंग युनिट स्थापन करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी आणि इन-हाउस कंपोस्टिंग युनिटच्या स्थापनेसाठी कमी व्याजावर कर्ज मिळण्याची व्यवस्था करावी.

४. ज्या गृहनिर्माण संस्थेचे इन-हाऊस कंपोस्टिंग युनिट आहे त्या सर्व सदस्यांना मालमत्ता करातून 50% सूट मिळावी कारण महापालिका कचरा गोळा करण्यासाठी अनेक कोटी खर्च करते आणि गृहनिर्माण संस्था जर इन-हाऊस कंपोस्टिंग युनिट सुरु करणार असेल तर हा खर्च फार कमी होईल. त्याचा फायदा सोसायटी सदस्यांना झाला पाहिजे.

५. जे बल्क वेस्ट जनरेटर (BWG) आहेत आणि ऑनसाइट कंपोस्टिंग नियमांचे पालन करत आहेत तसेच प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरत आहेत त्यांच्यासाठी महापालिकेने सोसायट्यांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र (मोहल्ला क्लिनिक/जिजाऊ क्लिनिक सारखे) सुरु केले पाहिजेत.

६. सोसायट्यांमध्ये असलेल्या कंपोस्टिंग युनिट्समधून तयार होणारे कंपोस्ट खरेदी करण्याची जबाबदारी पालिकेने घेतली पाहिजे. त्यातून कंपोस्टिंग युनिटच्या देखभालीचा खर्च वसूल होऊ शकेल.

७. कायद्या मध्ये इन-हाऊस कंपोस्टिंग युनिट सुरु करण्याबाबत म्हटले आहे त्यामुळे सोसायटी मध्ये जागा नसल्यास आपण थर्ड पार्टी वेंडर ला द्या असे सोसायटी धारकांना सांगू नये उलट ८ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ८ आठ कंपोस्टिंग युनिट्सची स्थापना करावी.

आंदोलनामध्ये चेतन बेंद्रे, ब्राह्मनंद जाधव, मनोहर पाटील, गोविंद माळी, प्रविण शिंदे, स्वप्निल जेवळे, चंद्रमणी जावळे, स्मिता पवार, नाजनीन मेमम, सरोज कदम, मीनाताई जावळे, संजय मोरे, सुरेश भिसे, राजेश सपारे, सीमा यादव, आशुतोष शेळके, अजय सिंग आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय