Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड महापालिकेचे बंद पडलेले स्विमिंग पूल सुरू करा आम आदमी पार्टीची...

पिंपरी चिंचवड महापालिकेचे बंद पडलेले स्विमिंग पूल सुरू करा आम आदमी पार्टीची आयुक्तांनाकडे मागणी

पिंपरी चिंचवड : महानगरपालिकेचे बंद पडलेले स्विमिंगपूल पूर्ववत सुरू करा अशी मागणी आम आदमी पार्टीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र वाघ यांच्याकडे केली आहे, त्यांनी चर्चेअंती पंधरा दिवसांत  स्विमिंग पूल सुरू करण्याचे आश्वासन दिले.

कोरोनापासून शहरातील सर्व स्विमिंग पूल बंद आहेत ते तातडीने सुरू करण्यात यावेत, अण्णासाहेब मगर स्टेडियमचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, स्टेडियममध्ये ऑलिम्पिकच्या 20 खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून खेळाडूंना चालना मिळेल. क्रीडा प्रबोधनी शाळांमध्ये खेळाडूंसाठी सेमी इंग्लिशचा अभ्यास सुरू करण्यात यावा, पिंपरी चिंचवड मधील जे खेळाडू आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय लेव्हलवर खेळतात त्यांचे मानधन स्कॉलरशिप वाढविण्यात यावी, ऑलम्पिक मधील प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र असे स्टेडियम बनवण्यात यावे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक नाहीत त्या शाळेमध्ये त्वरित शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशा मागण्या आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहेत. या मागण्या त्वरित मंजूर न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने जन आंदोलनाचा इशारा आपचे युवा नेते राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे यांनी दिला आहे.

यावेळी आपचे शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आपचे प्रवक्ते प्रकाश हगवणे, डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ.अमर डोंगरे, आपचे युवा नेते राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे, सुरेश बावनकर, आप महिला नेत्या सिता केंद्रे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय