Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभोसरी आणि कासारवाडी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करत आम आदमी पार्टीची प्रचाराला...

भोसरी आणि कासारवाडी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करत आम आदमी पार्टीची प्रचाराला सुरुवात

पिंपरी चिंचवड : ५ फेब्रुवारी रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भोसरी आणि कासारवाडी येथे आपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आपचे राज्य संघटन मंत्री विजय कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

निवडणूक आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२२ साठी प्रभाग रचना जाहीर केल्याबरोबर सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीनेही यामध्ये आघाडी घेत ५ फेब्रुवारी रोजी काळभोर नगर येथील हनुमान पुतळा येथे प्रचाराचा नारळ फोडला. 

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा ; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

यानंतर सांय. ४ वाजता भोसरी गावठाण येथे आपचे भोसरी विधानसभा उपाध्यक्ष मंगेश आंबेकर यांच्या आणि कासारवाडी विभाग अध्यक्ष मोतीराम अगरवाल याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आपचे राज्य संघटक विजय कुंभार याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत आणि पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उदघाटन प्रसंगी बोलताना विजय कुंभार म्हणाले की, “आम जनतेचे कल्याण होण्यासाठी नगरसेवक हे आम आदमीच असले पाहिजेत. यासाठीच आप आपणच होऊ नगरसेवक ही घोषणा घेऊन महापालिका निवडणुकीत उतरत आहे. “

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती

भाजपा हा भ्रष्टाचारी पक्ष : नाना पटोले

“आपने दिल्ली मधील शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात घडवलेल्या क्रांतिकारी सुधारणांचा आढावा घेण्यासाठी महापालिका नगसेवकांनी दिल्ली दौरा केला, परंतु महापालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य बजेटचे तीन तेरा वाजवले आहेत, म्हणूनच पिंपरी चिंचवडला शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आम आदमी पार्टीच्या दिल्ली मॉडेलची गरज असल्याचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.”

यावेळी जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांच्या हस्ते नवीन कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश करण्यात आले. तन-मन-धनाने आपचा प्रसार आणि प्रचार करणारे कार्यकर्ते हेच आम आदमी पार्टीची खरी ताकद असल्याचे किर्दत यांनी यावेळी नमूद केले.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

या कार्यक्रमाला आम आदमी पार्टीचे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचारप्रमुख राज चाकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय