Tuesday, May 21, 2024
Homeराज्यव्हिडिओ : देशभरातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे – बाबा...

व्हिडिओ : देशभरातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे – बाबा कांबळे 

तमिळनाडूतील तिरुतचिरापल्ली येथे चालक – मालकांचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

तिरुचिरापल्ली : भारतात 25 कोटी पेक्षा जास्त ऑटो टॅक्सी बस ट्रक टेम्पो चालक आहेत. वाहतुकीत चालकांचे महत्वाचे योगदान आहे. सरकार देशात कोट्यवधी रुपयांचे रस्ते बनवत आहे, पण या रस्त्यांवर सेवा देणारे वाहन चालक अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. महागाईमुळे रिक्षा चालकांसह सर्वच प्रकारच्या ड्रायव्हर यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे भारत सरकारने देशातील सर्व वाहनचालक-मालक समाजासाठी सामाजिक सुरक्षा मंडळ तयार करावे आणि या मंडळाच्या माध्यमातून वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन, विमा योजना, आरोग्य योजना द्याव्यात. मुलांसाठी उच्च शिक्षक योजना राबवा. A welfare board should be established for rickshaw pullers across the country – Baba Kamble

देशभरातील सर्व प्रकारच्या चालक मालकांच्या संघटना वेगवेगळ्या राज्यात प्रयत्न करत आहेत, मात्र आता देशातील सर्व संघटनांनी एकत्र येण्याची गरज असून सर्व चालक बांधवांनी एकत्र येऊन राजधानीतील संसद भवनासमोर मोठे आंदोलन करावे. प्रत्येक राज्यात होत असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांना देशव्यापी करून, सर्वांनी संघटित होऊन दिल्लीत मोठे आंदोलन उभे केले पाहिजे, यासाठी लवकरच दिल्ली येथे तीव्र आंदोलन करणार अशी घोषणा भारतीय ड्रायव्हर ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी या अधिवेशनात केली. 

तमिळनाडु ट्रक एसोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष पद्मराज जी. यांच्या अध्यक्षतेखाली हे राष्ट्रीय संमेलन पार पडले 

यावेळी भारतीय भारतीय ड्रायव्हर ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक सचिव, राकेश शिंदे, (मुंबई महाराष्ट्र) राष्ट्रीय उपाध्यक्ष, सिंथल कुमार (तमिलनाडु) राष्ट्रीय उपाध्यक्ष रवि रेड्डी (कर्नाटक) राष्ट्रीय सचिव सुमीर अंबावत (दिल्ली) राष्ट्रीय सचिव अनवर पाशा (आंध्र प्रदेश) राष्ट्रीय संगठक रवि राठौड़ (दिल्ली), परीक्षक पाठक (पंजाब), के. गोपालकृष्ण (कन्याकुमारी) यांच्यासह देशभरात विविध राज्यातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुमीर अंबावत म्हणाले की, 6 मार्च 2023 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संसद भवनासमोर चालक दिन ड्रायव्हर डे साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली या मागणीसाठी दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. चालक दिनाबाबत संघटनेत एकच मत नाही, काहीं संघटना 1 सप्टेंबर ड्रायव्हर डे म्हणून साजरा करतात तर, काहीं 17 सप्टेंबर हा दिवस ड्रायव्हर डे म्हणून साजरा करत आहेत सरकार तारीख जाहीर करेल ती आपण स्वीकारली पाहिजे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मराज जी म्हणाले की, आमचा राष्ट्रीय फेडरेशन खूप चांगले काम करत आहे, तामिळनाडूचे सर्व चालक आणि संघटना फेडरेशनच्या पाठीशी उभ्या आहेत, आम्ही दिल्ली, जम्मू काश्मीर, राजस्थान श्रीगंगानगर, महाराष्ट्र आणि देशातील विविध राज्यांमध्ये जात आहोत. आणि चालक जागृती करत आहोत, कर्नाटक सीमावर चालकांची लूट होत आहे, सोलापूर शहरात आणि महाराष्ट्रातील काही भागात डिझेल चोरी केली जात आहे, राज्यातील चालकांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत.

भारतातील 25 कोटी चालकांसाठी चालक आयोग स्थापन करावा, देशाची राजधानी दिल्लीत चालक मालकाचे स्मारक बांधावे, ऑटो टॅक्सी चालकांच्या विविध समस्यांसाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, राज्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपावरील भेसळ थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, टोलनाक्यांवरील भ्रष्टाचार संपवावा, वाहनचालकांना कायमस्वरूपी घरांची सोय करावी. या सर्व मुद्द्यांसह एकूण तेवीस ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आले. रवी रेड्डी, राकेश शिंदे, रवी राठोड यांनी ठराव मांडले व सर्व ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय