वेल्हे : सिंहगड किल्ल्यावर कोसळलेल्या कड्याच्या दरडखाली चिरडून पुण्यातील एका ट्रेकरचा दुदैंवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हेमंत धिरज गोला (वय ३१, रा. मित्र मंडळ चौक, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड एथिक्स ट्रेकिंग स्पर्धेत हेमंत गाला याच्या सह राज्यभरातील तीनशे ट्रेकर्स सहभागी झाले होते. संध्याकाळी मात्र हेमंत हा गडावरून परत आला नसल्याने त्याच्या वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. अथक परिश्रमानंतर हेमांगचा मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखाली आढळला. मध्यरात्री बँटरीच्या प्रकाशात साडेबारा वाजण्याच्या सुमारास घनदाट जंगलातील १५० फूट खोल दरीत उतरून वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी दोराच्या साह्याने हेमंत याचा मृतदेह बाहेर काढला. तेथुन तो हवेली पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ससुन रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेमंत हा पुण्यातील मित्र मंडळ चौक येथील राहणार होता. याला लहानपणापासून ट्रेकिंग, गिर्यारोहणाची आवड होती. निष्णात गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने राज्यातील गडकोट, सुळके, दुर्गम किल्ले सर केले. हिमालयातही त्याने ट्रेकिंग केले होते. हेमंत याच्या दुर्दैवी मृत्यूने गाला कुटुंबासह त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. हेमंत कुटुंबातला एकलुता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे.