Snakebite : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातून एक अतिशय अजब आणि हैराण करणारं सर्पदंश (Snakebite) प्रकरण समोर आलं आहे. विकास दुबे नावाच्या 24 वर्षीय तरुणाला महिनाभरात पाच वेळा साप चावल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी उपचारानंतर तो बरा झाला आहे, ज्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विकास दुबे, जो फतेहपूर जिल्ह्यातील मलवा पोलीस स्टेशन हद्दीतील सौरा गावात राहतो, त्याला पहिल्यांदा 2 जून रोजी रात्री 9 वाजता बिछान्यातून उठताना साप चावला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले, जिथे दोन दिवस उपचारानंतर तो बरा झाला आणि घरी परतला. कुटुंबीयांनी हे एक सामान्य अपघात मानले. मात्र, 10 जूनच्या रात्री पुन्हा सापाने त्याला चावा घेतला. यावेळीही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचारानंतर तो पुन्हा बरा झाला.
साप चावल्यानंतर विकासला सापाची भीती वाटू लागली आणि त्याने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. मात्र, सात दिवसांनंतर, 17 जून रोजी पुन्हा घरात सापाने दंश केला. त्याची प्रकृती बिघडू लागली आणि कुटुंबीय घाबरले. परत त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन तो बरा झाला.
चौथ्यांदा सापाने सात दिवसही जाऊ दिले नाहीत. घटनेच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सापाने विकासला चावा घेतला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले, तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यावेळीही तो उपचारानंतर बचावला.
मावशीच्या घरी चावला साप
अशा स्थितीत नातेवाईक आणि डॉक्टरांनी विकासला काही दिवसांसाठी दुसरीकडे पाठवण्याचा सल्ला दिला. सल्ल्यानुसार विकास त्याच्या मावशीच्या घरी (राधानगर) राहायला गेला. मात्र, गेल्या शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा मावशीच्या घरातच साप चावला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला त्याच रुग्णालयात दाखल केले, जिथे विकासवर सध्या उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांची चिंता
विकासच्या सर्पदंशाच्या या अजब आणि धक्कादायक मालिकेमुळे त्याच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सापाची भीती आणि वारंवार होणाऱ्या सर्पदंशामुळे (Snakebite) त्यांचे जीवन अतिशय त्रस्त झाले आहे. त्याला आता भविष्यात काय घडणार याची चिंता आहे. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली
धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ
ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा
ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी