Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणप्राध्यापकांंचे थकित वेतनासाठी डाॅ. जे. जे. मगदूम काॅलेज ऑफ इंजिनिअरींग समोर एक...

प्राध्यापकांंचे थकित वेतनासाठी डाॅ. जे. जे. मगदूम काॅलेज ऑफ इंजिनिअरींग समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण.

जयसिंगपूर : येथील डाॅ.जे.जे.मगदूम काॅलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्राध्यापक कर्मचाऱ्यांचे थकित वेतनासह विविध मागण्यांसाठी शिवाजी विदयापीठ शिक्षक संघ (सुटा) च्या वतीने  आज महाविद्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

यावेळी प्रा. प्रशांत पाटील, प्रा. दिपाली काळे, प्रा. दादासाहेब देसाई, प्रा. मल्हारी तांदळे, प्रा. शामला महाडीक उपोषणास बसले होते. सुटाच्या वतीने काॅलेज व्यवस्थापनाशी प्राध्यापक कर्मचाऱ्यांचे अकरा महिन्यांचे थकीत वेतन, शासन नियमाप्रमाणे महागाई भत्ता, पी. एच. डी. च्या वार्षीक वेतनवाढी, प्राध्यापकांना स्थान निश्चितीचा लाभ, सेवा-पुस्तिका व वेतनप्रमाणपत्र इत्यादी बाबत आंदोलनापूर्वी चर्चा केली होती. परंतु व्यवस्थापनाने या मागण्यांच्या पूर्ततेबाबत नकार दिल्याने हे आंदोलन सुरू केले आहे.

वस्तुतः विद्यार्थ्यांची टयुशन फी ही प्राध्यापक व कर्मचाऱ्यांंच्या वेतनासाठीच खर्च करावी व या निधीची स्वतंत्र बँक खाते असावे असा शासन, तंत्रशिक्षण परिषद व शिवाजी विदयापीठ यांचा नियम आहे. परंतु व्यवस्थापनाने त्याचे पालन केले नाही त्यामुळे काॅलेज व्यवस्थापनाकडे कोटयावधी रूपयांचा वाढावा असतानाही प्राध्यापक कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत नाहीत.

शिवाजी विदयापीठाने काॅलेज प्रशासनास प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासंबंधी वेळोवेळी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे काॅलेज व्यवस्थापनाने प्राध्यापक कर्मचाऱ्यांचे एक प्रकारे हे आंदोलन लादले असल्याचे ‘सुटा’ने म्हटले आहे. काॅलेज व्यवस्थापनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेवून मागण्यांची पूर्तता करण्यासंबंधी २ सप्टेंबर पूर्वी ठोस निर्णय घेतले नाहीत तर २ सप्टेंबर पासून महाविदयालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा ‘सुटा’चे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह प्रा. डाॅ. सुभाश जाधव यांनी दिला आहे.

आंदोलनाचे नेतृत्व ‘सुटा’चे पदाधिकारी प्रा. डाॅ. दत्तात्रय भोसले, प्रा. डाॅ. संतोष जेठीथोर, प्रा. डाॅ. गजानन चव्हाण, प्रा. संदिप गायकवाड, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. मंदार कोलप आदींनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय