Sangamner : सासरकडील मंडळींच्या जाचाला कंटाळून २७ वर्षीय विवाहितेने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.०१) घडली असून या प्रकरणी रविवारी मयत विवाहितेचा पती, सासू आणि सासरा अशा तिघांविरोधात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. (Sangamner)
आरती रविंद्र साबळे (रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) असे मयत विवाहितेचे तर तिचा पती रविंद्र कारभारी साबळे, सासू लता कारभारी साबळे, सासरा कारभारी दादा साबळे (सर्व रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहे. मयत आरती साबळे यांच्या आई मंजुळा शिवाजी हासे (वय ४७, रा. चिखली, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. गुन्हा दाखल झालेल्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोरोनात लग्न लावून दिले, लग्नात हुंडा पण दिला नाही. या कारणावरून रविंद्र साबळे हा नेहमी दारू पिऊन व्यसन करून आरती साबळे यांना तू माहेरहून पैसे मागून घे नाहीतर परिणामांना सामोरे जा, अशी धमकी देऊन शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करायचा. तसेच त्यांचे सासू-सासरे आरती साबळे यांना स्वयंपाक जमत नाही. लग्नात हुंडा पण दिला नाही. असे म्हणून नेहमी टोमणे मारायचे. शारीरिक, मानसिक त्रास दिल्याने आरती साबळे यांनी घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिघांनी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. असेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पहिले अकस्मात मृत्यूची नोंद असताना पोलिसांनी केलेल्या तपासानंतर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक ए. के. मोकळ अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा :
ब्रेकिंग : गॅस सिलिंडर स्वस्त ; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना दिलासा
ब्रेकिंग : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल