Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

Bhandup : देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोग चांगलीच काळजी घेत आहे. या आचारसंहिता काळात रोकड रक्कम नेण्यावर निर्बंध आहेत. देशातील विविध भागातून निवडणूक आयोगाने रोकड रक्कम ताब्यात घेतल्याच्या बातम्या येत आहे. असे असताना आता थेट पैशाने भरलेली गाडी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या हाती लागली आहे. या बातमीने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

भांडूप (Bhandup) येथील सोनापूर सिग्नलवर शनिवारी रात्री एकच्या सुमारास नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी गाड्यांची तपासणी करताना एका गाडीत मोठ्याप्रमाणावर रोकड (Cash Seized) आढळून आली. सोनापूर सिग्नलवर गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समजते. सध्या अधिकाऱ्यांकडून नोटांची मोजणी सुरू असून या प्रकरणात चौकशी सुरु झाली आहे.

दरम्यान, या गाडीत रोख रक्कम असल्याचे समजल्यानंतर ही गाडी तात्काळ भांडूप पोलीस ठाण्यात नेण्यात आली. ही रक्कम जवळपास साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे कळाल्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेली गाडी ही एटीएमचे पैसे वाहतूक करणाऱ्या गाडीसारखी आहे.

महाराष्ट्रात गेल्या ४४ दिवसांत ४० कोटींची रक्कम पकडली आहे. ६९.३८ कोटींचे मौल्यवान धातू जप्त केले आहेत. ३५ लाख लिटर दारु, ७९.८७ कोटींच्या अन्य वस्तू असा ४३१.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही धडक कारवाई केली जात आहे.

निवडणूक आयोगाने केलेल्या या कारवाईतील गाडीतील रक्कम कुणाची आहे, कुठे घेऊन चालले होते. यासंदर्भात काहीच उत्तरे गाडी चालकाने दिली नाही. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिस करत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ

ब्रेकिंग : राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट तर “या” भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मोठी बातमी : नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

संबंधित लेख

लोकप्रिय