sangli : सांगली शहरात मोठी खळबळजनक घटना घडली आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख आणि सध्या भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुधाकर खाडे यांची आज सकाळी हत्या करण्यात आली. मिरज-पंढरपूर रोडवरील राम मंदिराजवळ प्रॉपर्टीच्या वादातून त्यांच्यावर खुनी हल्ला झाला. हल्लेखोराने कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करून गंभीर जखमी केले, त्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हत्याकांडाच्या संदर्भात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील अधिकारी करत आहेत.
या हत्याकांडामुळे सांगलीतील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चिंतेचा सूर उमटला आहे.सध्या पोलिसांकडून या हत्येच्या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
sangli
हेही वाचा :
राज्यात थंडीचा जोर वाढणार ; हवामान विभागाने दिला इशारा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
अमित शाह यांचं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; समर्थ रामदासांचा उल्लेख करत गुलामीचा उल्लेख
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर
चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा
शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले ; छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा समोर
नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार
महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा