Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणमुठेवाडगाव येथून राहुल नानासाहेब पेटारे हा १९ वर्षीय तरुण बेपत्ता

मुठेवाडगाव येथून राहुल नानासाहेब पेटारे हा १९ वर्षीय तरुण बेपत्ता

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील रहिवासी नानासाहेब नारायण पेटारे आणि पत्नी पूजा पेटारे यांचा मुलगा राहुल पेटारे वय १९ वर्ष हा तरुण शनिवार ८ जुलैपासून बेपत्ता झाला असून कुठे दिसल्यास तरूणाच्या कुटूंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नानासाहेब नारायण पेटारे आणि पत्नी पूजा पेटारे हे दांम्पत्य मुठेवाडगाव येथे राहत असून मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना गणेश आणि राहुल ही दोन मुले आहेत. शनिवार ८ जुलै रोजी १० वाजताच्या सुमारास नानासाहेब यांची आपला मुलगा राहुलशी पैशावरून थोडी कुरबूर झाली. त्यानंतर राहुलने कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेला. त्यानंतर त्याचा गावातील मित्र महेशने राहुलला श्रीरामपूर येथील बस स्थानकावर पाहिले होते. तेव्हा पासून राहुल घरी आलेला नाही.

राहुलचा नातेवाईक, मित्रमंडळी तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला. परंतु तो कुठेही मिळू शकला नाही. घरातून जाताना राहुलने आपला फोन घरी ठेवला असून घरातून निघताना त्याच्याकडे केवळ ४०० रूपये असल्याचे सांगितले जात आहे. राहुल कुठे दिसला तर तात्काळ ९७६५८३८१४६, ७४९९५६८८९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्याच्या कुटूंबीयांनी नागरिकांना केले आहे.

राहुलचे वर्णन
नाव – राहुल नानासाहेब पेटारे (वय 19 वर्ष)
पत्ता – मुठेवाडगाव ता. श्रीरामपूर जि. अ.नगर
रंग – सावळा, उंची ५ फूट ३ इंच
शरीर बांधा – मध्यम, नाक सरळ, केस बारीक काळे
अंगात लाल रंगाचा फुल बाहीचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, पायात सॅंडल

हा मुलगा आढळून आल्यास ९७६५८३८१४६, ७४९९५६८८९६ या क्रमांकावर संपर्क साधा.

संबंधित लेख

लोकप्रिय