Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Karadi Sanganna: भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

Karadi Sanganna : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टी ला कर्नाटकमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे विद्यमान खासदार कराडी सांगन्ना यांनी भाजपला रामराम करत आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. (BJP MP Karadi Sanganna joins Congress)

---Advertisement---

कोप्पल मतदारसंघातून दोन वेळा विजयी झालेले सांगन्ना यंदा पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कॉंग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी सांगन्ना यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत केले आहे.

कर्नाटकात अनेक विद्यमान खासदारांचे तिकिट कापल्यामुळे भाजपला बंडखोरीचा राज्यात मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत या राज्यांतून भाजपचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात फटका सहन करावा लागला व सत्ता गमवावी लागली.

---Advertisement---

दक्षिण भारतात भाजपा बाबत निराशा

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाजपासाठी अनुकूल वातावरण दिसत नाही. उरल्यासुरल्या कर्नाटकामध्ये भाजप किती जागा आपल्या पदरात पाडणार यात शंका आहे. कारण, भाजपाला अंतर्गत बंडाळीला सामोरे जावे लागत आहे. विद्यमान खासदारांचे तिकिट कापल्यामुळे स्वपक्षातच नाराजीचा सूर आहे. त्यामुळे दक्षिण भारतात भाजपा बाबत नाराजीचे चित्र आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !

लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना

---Advertisement---

Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles