Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याImtiaz Jaleel : एमएआयएम चा महाराष्ट्रातील पहिला उमेदवार जाहीर

Imtiaz Jaleel : एमएआयएम चा महाराष्ट्रातील पहिला उमेदवार जाहीर

Imtiaz Jaleel: ‘एमएआयएम’ने राज्यातील आपला एक उमोदवार जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) या लोकसभा मतदार संघात ‘एमएआयएम’कडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणूकीत एमएआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही मात्र, एमएआयएमचे उमोदवार इम्तियाज जलील हे अवघ्या काही मतांच्या फरकाने निवडून आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना 3 लाख 84 हजार 550 मतं मिळाली. तर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना सर्वाधिक 3 लाख 89 हजार 42 इतकी मतं लोकांनी दिली होती.

आता पुन्हा एमएआयएमने इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे. ‘एमएआयएम’चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाणार आहे. तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. 

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी

मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

संबंधित लेख

लोकप्रिय