Sunday, November 24, 2024
Homeजुन्नरJunnar : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा

Junnar : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा

Junnar : अल्पवयीन मुलगी (child marriage) असतानाही तिचे लग्न लावून दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ॲक्शन घेऊन आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर तसेच उपस्थित 40 ते 50 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे. यांच्यावर भादवि कलम 188, 471 बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कलम 9, 10, 11 प्रमाणे जुन्नर (Junnar) पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमतवाडी (ता.जुन्नर) येथे 16 मार्च 2024 रोजी भवानी लॉन्स मंगल कार्यालयात ही घटना घडल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे‌‌‌‌. या प्रकरणी अश्विनी सतीश नेहरकर यांनी फिर्याद दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सोमवारी येथून पंचायत समिती विस्तार अधिकारी धेंडे व तालुका महिला संरक्षण अधिकारी भाग्यश्री लहू घाडगे, बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडून माहिती मिळाली की सोमतवाडी या गावी भवानी लॉन्स या मंगल कार्यालयांमध्ये बालविवाह होणार आहे, अशी माहिती मिळाल्याने याठिकाणी फिर्यादी या ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्त्यां, परिवेक्षक आपटाळे, पोसई तीटमे, पोलीस अंमलदार पवार हे मंगल कार्यालयात गेले.

मंगल कार्यालयांमध्ये नवरी नवरदेव यांची आई वडिलांना बोलावून घेऊन मुलीचे वयाबाबत विचारपूस करून वयाचा पुरावा मागणी केला असता त्यांनी मुलीचे वयाबाबतचा पुरावा म्हणून आदिमाया शक्ती विद्यालय इंगळून या शाळेचे शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स प्रत दाखविली. त्यांची पाहणी केली असता त्यामध्ये नवरी हिचा जन्म दिनांक 14/7/2005 असा होता. सदर दाखल्यामध्ये शंका वाटल्याने संबंधित मुला मुलीचे आई-वडिलांना लग्न लावण्यासाठी आलेले भटजी तसेच तेथे असणारे इतर ग्रामस्थांना नवरीच्या वयाची खात्री होत नाही तोपर्यंत तुम्ही लग्न लावू नका असे सांगून अधिकारी सदर मुलीच्या वयाची खात्री करण्यासाठी लग्न हॉल मधून बाहेर पडले.

मात्र, मुलीच्या वयाची खात्री करत असताना लग्न हॉलमध्ये मंगलाष्टका चालू झाल्या, (child marriage) त्यावेळी सर्व अधिकारी लग्न हॉलमध्ये जाईपर्यंत तेथे असलेल्या ग्रामस्थ व मुला मुलीचे आई-वडील पाहुणे नातेवाईक यांनी सदर लग्नाचा विधी पूर्ण पार पाडला. मुलीचे आई-वडील, मुलाचे आई-वडील, लग्न लावणारे भटजी मुलाचे चुलते व इतर ग्रामस्थ लग्न हॉल मालक यांनी नवरी – नवरा याचे भटजींनी मंगलाष्टका म्हणून लग्न लावून दिले. त्यांना लग्न लावू नका असे सांगून देखील त्यांनी काहीही एक न ऐकता लग्न लावून दिले.

मुलीचे वयाबाबत मूळ कागदपत्रांची पाहणी व खात्री केली असता त्यामध्ये नवरी हीची जन्मतारीख 14/7/2007 अशी असून तिचे वय 16 वर्ष आठ महिने इतके असून सदर मुलगी ही अज्ञान आहे, हे नवरीच्या आई-वडील यांना माहीत असून देखील त्यांनी सदर मुलीचे लग्न नवऱ्या मुलगा यांच्याशी त्याचे आई-वडील चुलते यांच्याशी बोलणी करून ते लग्न दिनांक 16/03/2024 रोजी दुपारी 4:15 वाजता चा महूर्तावर ठरवून त्यांनी सदर लग्न दुपारी 04:00 वाजता लावून दिले. (Junnar)

याप्रकरणी नवरदेव, मुलीचे आई-वडिल, नवऱ्याचे आई-वडिल, चुलते, भटजी, मंगल कार्यालय मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.ना. हिले करत आहेत.

whatsapp link

हे ही वाचा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान, वाचा वेळापत्रक

मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

संबंधित लेख

लोकप्रिय