Friday, December 27, 2024
Homeग्रामीणकोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेत गरजूंना मदत वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेत गरजूंना मदत वाटप

आंबेगाव (२६ मे) :- 

              पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी गरजू कुटुंबाना टेक महिंद्रा ,स्पर्श आणि उर्मी संस्था,यांच्या अंतर्गत टेक महिंद्रा कंपनीच्या सीएसआर फंडातून २०० लोकांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप करण्यात आले. आंबेगाव तालुक्यातील ठाकर वस्ती येथे हे साहित्य वाटप करण्यात आले.

           स्थानिक पातळीवर गरजू कुटुंबाची निवड व स्थानिक संयोजन आदीम संस्था व किसान सभा या संस्था संघटनेने केले.

          कुमार कुऱ्हाडे, डॉ.अमोल वाघमारे यांनी 

 समन्वय करण्याचे काम केले. यावेळी आंबेगाव तालुका तहसीलदार श्रीमती रमा जोशी, पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, टेक महिंद्रा कंपनी,उर्मी संस्था व स्पर्श संस्था यांचे इम्रान आलमेल, उर्मी संस्थेचे राहुल शेंडे, किसान सभेचे व आदीम संस्थेचे अशोक पेकारी, राजू घोडे, दत्ता गिरंगे, अविनाश गवारी, सुभाष भोकटे, सागर पारधी, रुपाली खमसे आदीसह नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय