Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या रेसिडेंट डॉक्टरांना वेतनवाढीची या संघटनेने केली ...

कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या रेसिडेंट डॉक्टरांना वेतनवाढीची या संघटनेने केली मागणी. या नेत्यांना केली; लक्ष घालण्याची विनंती.

नाशिक(प्रतिनिधी):- कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या रेसिडेंट डॉक्टरांना वेतनवाढ करण्याची मागणी सेंटर ऑफ ट्रेंड युनियन (सिटू) या कामगार संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  यामध्ये शरद पवारांनी लक्ष घालवे अशी विनंती सिटूच्या वतीने त्यांना करण्यात आली आहे.

          राज्यातील विविध मेडिकल कॉलेज व‌ हॉस्पिटलमध्ये रेसीडेंट डॉक्टर्स हे पूर्णवेळ सेवा देत आहेत. या रेसिडेंट डॉक्टरच्या वेतनवाढीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यापूर्वी भाजपा सरकारने एक ऑगस्ट २०२८ पासून वेतनवाढ देण्याचे मान्य करूनही त्याची अंमलबजावणी केली नाही.

            त्यामुळे रेसिडेंट डॉक्टरांमध्ये असंतोष आहे. यासंदर्भात सिटूने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे व अमित देशमुख यांना निवेदन देऊन वेतन वाढ करण्याची मागणी केली .

         यासंदर्भात डॉ. डी.एल.कराड यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यांनी तातडीने यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच रेसिडेंट डॉक्टरांची संघटना मार्डचे पदाधिकारी व आरोग्य मंत्र्यांची बैठक व्हावी, यासाठी विधानपरिषदेचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी पुढाकार घेतला व त्यानुसार ही बैठक झाली. मंत्री आणि मार्डच्या पदाधिकारी यांच्याची दोन तास झाली आहे. त्यांच्या मागण्या बद्दल सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिले. 

         त्यामुळे रेसिडेंट डॉक्टरांचा वेतनवाढीचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी लक्ष घालावे, असे सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांंनी म्हटलेे आहे. 

संबंधित लेख

लोकप्रिय