(प्रतिनिधी) :- पुणे आणि नागपूर मध्ये एकाच आठवड्यात विराज जगताप आणि अरविंद बनसोडे या दोन दलितांच्या हत्येने महाराष्ट्र हादरून गेला आहे, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सतत होत आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे – पिंपळे सौदागर (पिंपरी-चिंचवड) येथे जातीयवादातून हत्या करण्यात आलेल्या विराज जगताप यांच्या कुटुंबाची भेट आज अंजलीताई आंबेडकर व सुजात आंबेडकर यांनी घेतली. भेट घेऊन त्यांनी कुटुंबियांचे सात्वन केले व कुंटुबाशी संवाद साधुन न्याय मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आपल्यापाठीशी उभी असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.