Thursday, November 21, 2024
HomeNewsरायगड:सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कामगारांवर अन्याय - संजोग वाघेरे

रायगड:सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कामगारांवर अन्याय – संजोग वाघेरे

माजगाव येथील कामगारांच्या साखळी उपोषणाला दर्शविला पाठिंबा

खालापूर/क्रांतिकुमार कडुलकर:- देशात सातत्याने कामगारविरोधी धोरणे लादण्यात .येत आहे. भांडवलशाहीचे हात बळकट करत कामगार वर्गाला कमजोर करण्याच्या या धोरणांमुळे सर्व प्रकारच्या कामगारांवर अन्याय होत आहे, असे मत मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी मांडले.


रायगड जिल्ह्यातील माजगाव (ता. खालापूर) येथे कोकण श्रमिक संघ संलग्न हिंदू मजदुर सभा, महाराष्ट्र कौन्सिल मे. कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लि. येथे स्थानिक कामगारांवर होणा-या अन्यायाविरुद्ध कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. या ठिकाणी उपस्थित राहून संजोग वाघेरे यांनी उपोषणकर्ते रोहिणी टेंबे व दत्तात्रय गारुडे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रसंगी युनियन अध्यक्ष संतोष भोईर, चौक गावचे सरपंच सचिन मते, प्रमोद काठवले यांच्यासह कामगार व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी उपोषणास बसलेल्या कामगारांशी संवाद साधत संजोग वाघेरे यांनी त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच, कामगारांचे हित विचारात घेऊन कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. परिणामी, कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडून कामगारांची पिळवणूक केली जाते. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसैनिक कायम पुढाकार घेतात. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष कामगारांच्या बाजुने उभा असून व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय