(भोपाळ):- भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रविवारी पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. भाजपा कार्यालयात झालेल्या प्रबुद्ध वर्ग संमेलनात प्रज्ञा ठाकूर आल्या होत्या, चीन कडून झालेल्या हल्ल्यावर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यावर माध्यमांशी बोलताना साध्वी यांनी म्हंटले कि,”विदेशी महिलेच्या गर्भातून जन्मलेला कोणताही व्यक्ती देशभक्त असू शकत नाही. चाणक्यने म्हटलं की, या भूमीचा पुत्र हाच देशाचे संरक्षण करू शकतो”, असे म्हणत त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
पुढे त्या म्हणाल्या की, “काँग्रेस पक्षामध्ये बोलण्याची सभ्यता नाही, संस्कृती आणि ती देश भक्ति नाही”, “दोन दोन देशाचे नागरिकत्व घेणारे लोक देशभक्त होऊ शकत नाही”, यातून देशभक्ती येणार तरी कुठून असं प्रश्न त्यांनी विचारला. या व्यतिरिक्त त्यांनी सांगितले की, चीन सोबत लढण्यासाठी देश तयार आहे. केंद्र सरकार चीनला संपूर्ण ताकदीने उत्तर देईल. भारताच्या एक इंच जमीनवर सुद्धा कोणी कब्जा करू शकत नाही.
या अगोदर सुद्धा प्रज्ञा ठाकूर यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.